मुंबईतील दहिसर परिसरात एका वृद्ध महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी (१३ मे २०२५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करण्याआधी वृद्ध महिलेने सुसाईट नोट लिहिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मर्लिन मेनन (वय, ७२) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मेनन मुंबईतील दहिसर येथील नवीन हेरिटेज इमारतीत वास्तव्यास होत्या. पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. दरम्यान, मंगळवारी दुपारी इमारतीच्या एका चौकीदाराला मेनन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात इमारतीच्या आवारात पडलेला आढळला. चौकीदाराने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान, पोलिसांना मेनन यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाईट नोट सापडली, ज्यात तिने लिहिले आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेनन यांच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्या आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होत्या, अशी माहिती मिळाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.