मुंबई : कॉलेजमध्येच विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, 2 संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 14:29 IST2018-07-26T12:25:21+5:302018-07-26T14:29:29+5:30

भांडुपमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai : Student killed Outside school In Bhandup | मुंबई : कॉलेजमध्येच विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, 2 संशयितांना अटक

मुंबई : कॉलेजमध्येच विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, 2 संशयितांना अटक

मुंबई - भांडुपमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुशील वर्मा असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सर्वोदय नगर येथील श्रीमती रामकली सन्मान सिंग महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या काही तरुणांनी सुशील वर्मावर महाविद्यालयाच्या आवारातच धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन त्याची हत्या केली आहे. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञातानं सुशीलला वर्गाबाहेर बोलावले आणि त्याच्यावर चाकून सपासप वार केले. सुशीलला वर्गाबाहेर जाऊन बराच वेळ झाल्यानं त्याचा शोध घेण्यासाठी मित्र बाहेर पडले. शोध घेत असताना सुशीलला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर तातडीनं त्याला अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.   

दरम्यान, सुशीलची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

 

Web Title: Mumbai : Student killed Outside school In Bhandup