Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:56 IST2025-08-08T11:55:50+5:302025-08-08T11:56:12+5:30

Public Holiday for Govt Employees: मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दोन सुट्ट्यांचा बोनस दिला आहे.

Mumbai state government employees get Rakhi Pournima and Gauri Visarjan leave | Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

Public Holiday List:मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन सुट्टयांचा बोनस मिळाला आहे. मुंबईसह उपनगर जिल्ह्यांना नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनाची सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली आहे. दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीला शनिवार आहे आणि सरकारी कार्यालये शनिवारी बंद असतात. त्यामुळे राज्य सरकारकडून राखीपौर्णिमा (नारळी पौर्णिमा) आणि ज्येष्ठागौरी विसर्जनाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरवर्षी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र यावेळी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी हे दोन्ही सण शनिवारी येत आहेत. तसेच आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना नियमित सुट्टी असते. त्यामुळे शासनाने दोन सुट्ट्या बदलण्याचा निर्णय घेतला.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात गुरुवारी परिपत्रक काढले. गोपाळकाला (दहीहंडी) १६ ऑगस्टला आहे. मात्र, त्या दिवशी शनिवार आहे. एरवी दहीहंडीची शासकीय सुट्टी असते. मात्र, त्या दिवशी शनिवार असल्याने तशीही सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल. त्याऐवजी आता शुक्रवारी (दि. ८ ऑगस्टला) नारळी पौर्णिमेची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबरला म्हणजे शनिवारी आहे. त्या दिवशी तशीही सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल. आता त्याऐवजी ज्येष्ठ गौरी विसर्जनानिमित्त २ सप्टेंबरला (मंगळवार) सुट्टी असेल. राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी हा आदेश लागू असेल.

Web Title: Mumbai state government employees get Rakhi Pournima and Gauri Visarjan leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.