कार दुभाजकाला धडकली, जळून खाक; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 18:49 IST2023-09-11T18:48:33+5:302023-09-11T18:49:13+5:30
मुंबईतील सायन परिसरात एक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातानंतर कारनं पेट घेतला. कारमध्ये पाच जण होते.

कार दुभाजकाला धडकली, जळून खाक; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी
मुंबईतील सायन परिसरात एक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातानंतर कारनं पेट घेतला. कारमध्ये पाच जण होते. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. प्रेम वाघेला (१८) आणि अजय वाघेला (२०) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. दोन सख्ख्या भावांचा या घटनेत मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
VIDEO: सायन येथे कार दुभाजकाला धडकली, कारनं घेतला पेट; दोन जणांचा मृत्यू pic.twitter.com/KAyD0WkMuK
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) September 11, 2023
सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर गंगा विहार हॉटेलजवळ पहाटे साडेचार वाजता एक ह्युंदाई आय-२० कार दुभाजकाला आदळली. कारमध्ये पाच जण होते. अपघातानंतर कारनं पेट घेतला. कार पूर्णपणे जळून खाक झाली. जखमींना उपचारासाठी सायन येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. हर्ष कदम (२०), रितेश भोईर (२५), कुणाल अत्तर (३३) हे तीन जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.