Mumbai: मुंबईत भाजपाच्या पोलखोलवर शिवसेनेचा पुन्हा हल्लाबोल, सभामंचासह इतर तयारी उधळून लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:11 IST2022-04-20T15:10:49+5:302022-04-20T15:11:58+5:30
Shiv Sena Vs BJP: दहिसर मध्ये भाजपाच्या पोलखोल वर शिवसेनेचा हल्लाबोल करत नवागाव परिसरात भाजपच्या पोलखोल सभेची तयारी शिवसेनेने उधळून लावली.

Mumbai: मुंबईत भाजपाच्या पोलखोलवर शिवसेनेचा पुन्हा हल्लाबोल, सभामंचासह इतर तयारी उधळून लावली
मुंबई - दहिसर मध्ये भाजपाच्या पोलखोल वर शिवसेनेचा हल्लाबोल करत नवागाव परिसरात भाजपच्या पोलखोल सभेची तयारी शिवसेनेने उधळून लावली. दहिसर प्रभाग क्रमांक 7 येथील नवागाव परिसरात महापालिकेच्या रस्त्यावर स्टेज टाकून आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल सभेची तयारी सुरू होती. त्यांनी पालिकेची आणि पोलिसांची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती असा दावा शिवसेनेने केला.
रस्त्यावरच स्टेज टाकत असल्याची तक्रार नागरिकांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या व येथील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांना केली. लगेच त्यांनी व शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली.या ठिकाणी जाऊन परवानागी दाखविण्यास सांगितली असता त्याला न जुमानता भाजपा कडून तयारी सुरुच होती.
या गोष्टींना आळा घालण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या सभेची अनधिकृतपणे सुरू असलेल्या तयारीला विरोध केला.यावेळी शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस आणि महापालिकेच्या सहाय्याने त्यांचा सभामंच आणि इतर तयारी शिवसेनेने उधळून लावली. बाळासाहेबांच्या मुंबपुरीत भाजपाची अशी अनधिकृत दादागिरी खापवून घेतली जाणार नाही असा इशारा शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला.