शाळकरी मुलासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला मिळाला जामीन; शिक्षिका म्हणाली, "आमच्याबाबत त्याच्या आईला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:04 IST2025-07-23T07:04:15+5:302025-07-23T07:04:30+5:30
एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका नामांकित शाळेच्या चाळीस वर्षीय महिला शिक्षिकेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी मंजूर केला.

शाळकरी मुलासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला मिळाला जामीन; शिक्षिका म्हणाली, "आमच्याबाबत त्याच्या आईला..."
मुंबई : एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका नामांकित शाळेच्या चाळीस वर्षीय महिला शिक्षिकेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्या. सबिना मलिक यांनी हा जामीन मंजूर केला.
गेल्या महिन्यात अटक केलेल्या शिक्षिकेला पॉक्सो आणि भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) आणि बालन्याय कायद्याच्या संबंधित तरतुदीअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मुलाची आई आपल्या नात्याविरोधात होती. त्यामुळे तिने आपल्याविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा शिक्षिकेने केला. मुलाबरोबर झालेला संवादही शिक्षिकेने न्यायालयात सादर केला. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या पालकांना त्याच्या आणि आपल्यात असलेल्या नात्याची माहिती होती. आपण विवाहित असल्याने ते या नात्याच्या विरोधात होते.
विद्यार्थ्याला शिक्षिकेबद्दल असलेल्या प्रेमाची भावना होती आणि ही बाब जाणूनबुजून लपविण्यात आली आहे, असे अर्जात म्हटले होते. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासंबंधी घेतलेल्या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या १६ वर्षाच्या विद्यार्थ्याकडे आरोपी आकर्षित झाली. जानेवारी २०२४ मध्ये पहिल्यांदा त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. आरोपी या मुलाला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे ती त्याचे लैंगिक शोषण करायची. आरोपीने हे सर्व आरोप फेटाळले.