Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:27 IST

Mumbai Santacruz Convent School News: सांताक्रूझच्या कलिना परिसरातील कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वसईत शिक्षिकेने केलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सांताक्रूझच्या कलिना परिसरातील कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापकाने दहावीतील १५ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांवर कुर्त्यातील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या शाळेत १३ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थीही कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्याला पाहताच 'तुझे वर्तन बेशिस्त आहे' असे दरडावत वर्गात बसवून ठेवण्याचे आदेश दिले आणि त्याच्या पालकांना बोलवण्यास सांगितले. मात्र, पालक तातडीने आले नाहीत.

मुख्याध्यापकांची अरेरावी; कुटुंबीयाचा आरोप

विद्यार्थ्याची आई व नातेवाईक सोमवारी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता, त्यांनी 'मी वकील आहे, जिथे जायचे तिथे जा', असा अशी भाषा वापरल्याचे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या चुलत भावाने सीसीटीव्ही फुटेजची मागणी २ करून ते पाहिले असता त्यात मारहाणीचा प्रकार स्पष्टपणे चित्रित झाल्याचे आढळले. त्यानंतर कुटुंबीयांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Principal Assaults Student in Convent School, Hospitalized; Similar Vasai Incident

Web Summary : Following the Vasai incident, a Santacruz principal assaulted a 10th-grade student. CCTV footage revealed the beating. Police filed a case; the student is hospitalized. Previously, the principal scolded the student for misbehavior on Children's Day.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबईशाळा