Join us  

मुंबई : चेंबूरमधील आर.के. स्टुडिओतील अग्नितांडव आटोक्यात, सामान जळून भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 3:12 PM

मुंबईतील चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे.

मुंबई, दि. 16 - चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे  स्टुडिओतील एका डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर ही आग लागली होती. दरम्यान भीषण अशा या आगीमध्ये स्टुडिओचा काही भाग आणि सामानही जळून खाक झाले आहे.  सुदैवानं या आगीत कोणतीही जीविताहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल झाल्या होत्या.  दुपारी 2.22 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आर.के. स्टुडिओमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर 2.37 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू केले. 

सेटसाठी लागणारे प्लायवूड या भागात असल्याने आग झपाट्याने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आणि अखेर आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि टँकर घटनास्थळी पोहोचले. शनिवारी शुटिंग नसल्याने स्टुडिओत फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली.  दोन तासांनंतर आग विझवण्यात यश आले असून आगीत स्टुडिओचे मोठे नुकसान झाल्याते समजते. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

धुराचे मोठ-मोठे पसरले होते लोट

या अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोट पसरले होते. यामुळे घाटकोपर-ठाण्याकडे जाणा-या रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. आगीची तीव्रता पाहता आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसरातील वाहतूक बंद केली होती. 

आर.के स्टुडिओत चित्रित झालेले सिनेमेसिनेमे                                 वर्षश्री 420                             1955जागते रहो                         1956अब दिल्ली दूर नही            1957जिस देश मे गंगा बहती है  1960संगम                                1964मेरा नाम जोकर                1970कल आज और कल           1971बॉबी                                 1973धरम करम                       1975सत्यम शिवम सुंदरम       1978बीबी ओ बीबी                   1981प्रेम रोग                           1982राम तेरी गंगा मैली           1985हिना                                1991प्रेम ग्रंथ                           1996आ अब लौट चले              1999 

 

टॅग्स :अपघातचेंबूरआर के स्टुडिओ