इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:39 IST2025-10-06T09:38:10+5:302025-10-06T09:39:30+5:30
Mumbai 1BHK, 2BHK Flat Rate: कधी काळी प्रॉपर्टीचे एकेरी आकड्यातील भाव आज अक्षरशः हजारो पटींनी वाढले.

इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
मुंबई हे जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहराच्या रिअल इस्टेट बाजारपेठेने शतकभरात प्रचंड बदल अनुभवले आहेत. १९०७-०८ या वर्षीचे मालमत्ता दर आणि आजचे दर यांची तुलना केली तर या स्वप्ननगरीच्या आर्थिक विकासाची, लोकसंख्येच्या वाढीची आणि शहरीकरणाची कथा उलगडते. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी मुंबईचा जीव केवढासा होता आणि आज तो किती अगडबंब झाला आहे, याची आणि मालमत्तेचे दर शंभर वर्षांत कसे हजारो पटींनी वाढले, याची प्रचिती देणारी ही रंजक आकडेवारी...
कधी काळी प्रॉपर्टीचे एकेरी आकड्यातील भाव आज अक्षरशः हजारो पटींनी वाढले
मुंबईतील कोणत्या भागात सध्या मालमत्ता दर काय? (आकडे रुपयांत, दर प्रति वर्गफुटासाठी)
भाईंदर पूर्व - ७,४०० ते ११,१००
मीरा रोड - ८,८०० ते १३,८००
दहिसर - १३,८०० ते २२,१००
बोरीवली पश्चिम - १७,००० ते ३०,१००
बोरीवली पूर्व - १५,९०० ते २६,३००
कांदिवली पश्चिम - २०,९०० ते ३६,१००
मालाड पश्चिम - १५,७०० ते २५,९००
गोरेगाव पश्चिम - १६,५०० ते २७,६००
गोरेगाव पूर्व - १७,००० ते २५,५००
अंधेरी पश्चिम - २१,७०० ते ३३,५००
अंधेरी पूर्व - १७,७०० ते २७,४००
विलेपार्ले पूर्व - २३,४०० ते ४२,०००
सांताक्रुज पश्चिम - २८,९०० ते ४७,५००
बांद्रा पश्चिम - ३३,३०० ते ५६,७००
वरळी - ३५,२०० ते ५५,९००
प्रभादेवी - ३५,००० ते ५९,८००
परळ - २६,१०० ते ४१,८००
चेंबूर - १८,००० ते २९,५००
कुलाबा - ३४,६०० ते ५५,५००
मुलुंड पश्चिम - १४,००० ते २७,९००
भांडुप पश्चिम - १३,९०० ते २०,६००
ठाणे - १०,८०० ते १७,३००
डोंबिवली पूर्व - ५,१०० ते ७,७००
कल्याण - ४,८०० ते ७,२००
ऐरोली - १०,८०० ते १६,०००
घणसोली - १०,९०० ते १७,७००
कोपरखैरणे - १०,९०० ते १७,०००
वाशी - ११,३०० ते १८,१००
खारघर - १२,४०० ते २३,३००
नेरूळ - ११,८०० ते २०,६००
सीबीडी बेलापूर - १३,४०० ते १९,४००
सीवूड्स - १३,१०० ते २२,४००
कामोठे - ६,८०० ते ११,१००
उलवे - १०,२०० ते १७,२००
पनवेल - ९,२०० ते १७,०००
द्रोणागिरी - ५,७०० ते ८,६००
१९०७-०८ या वर्षी मुंबईच्या विविध भागांमध्ये रिकाम्या प्लॉटचे दर असे होते...
चर्नी रोड - ३८ ते ५५
क्वीन्स रोड - ४२ ते ६०
ह्युजेस रोड - २५ ते ४०
वाळकेश्वर रोड -४०
मर्झबान रोड - ६०
ग्रँट रोड - २५ ते ५०
एस्प्लेनेड रोड - २०० ते ३००
प्रिन्सेस मार्ग - २५ ते ४२०
गिरगाव रोड - ४०
गिरगाव बॅक रोड - ३० ते ३५
दादर रोड - ९ ते १२
परळ रोड (उत्तर) - १५ ते ३०
आर्थर रोड - २५
कफ परेड - ४०
सँडहर्स्ट रोड (पश्चिम) - ४० ते ५५
डिट्टो (पूर्व) - ७५ ते १५०
करी रोड - १० ते १२
रिपन रोड - २०
काझी सय्यद मार्ग - १२०
शेख मेमन मार्ग - ३५०