Mumbai Rave Party: आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:48 IST2021-10-07T16:45:41+5:302021-10-07T16:48:43+5:30
Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छापेमारी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीनं (NCB) आज कोर्टात दिली आहे.

Mumbai Rave Party: आर्यन खानला गांजा कोण पुरवत होतं? NCBनं कोर्टात नाव सांगितलं, ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी
Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छापेमारी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीनं (NCB) आज कोर्टात दिली आहे. एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही अटक केली आहे. त्याच्यासह अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) यांना सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपली आहे. एनसीबीनं त्यांना आज कोर्टात हजर केलं असून आर्यन खानसह सर्व आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली आहे. यावेळी एनसीबीकडून आणखी काही पुरावे देखील कोर्टासमोर सादर करण्यात आले आहेत.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल याच प्रकरणाशी संबंधित १७ वी अटक केली. मुंबईतील पवई येथून एका अचित कुमार नावाच्या व्यक्तीला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अचित कुमार याच्याकडून २.६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती एनसीबीनं कोर्टात दिली आहे. इतकंच नव्हे, तर अचित कुमार गांजा पुरवण्याचं काम करतो असाही दावा एनसीबीनं कोर्टात केला आहे.
"आर्यन खान आणि अरबाज मर्चंटबाबत बोलायचं झालं तर अचित कुमार हा या दोघांना गांजा पुरवत होता. अचित कुमारकडून २.६ ग्रॅम गांजा देखील जप्त करण्यात आला आहे", अशी माहिती एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अचित कुमार गांजा पुरवत असल्याचं एनसीबीच्या चौकशीत उघड झालं आहे. अचित कुमार याची माहिती देखील आर्यन खान यानंच एनसीबीला चौकशी दरम्यान दिल्याचं एनसीबीच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. अचित कुमार गांजा पुरवणाऱ्या नेटवर्कचा दुवा असल्याचं एनसीबीनं कोर्टात म्हटलं आहे. अचित कुमारशी असलेल्या संपर्कामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचित कुमार याला कोर्टानं ९ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे.
संबंधित बातम्या:
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला का पकडलं? समीर वानखेडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं...
आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न