Join us

बोरिवली-दहिसरमध्ये मलेरिया, डेंग्यूचा उद्रेक! ठाकरे गटाकडून महापालिकेकडे उपाययोजनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:02 IST

Borivali Dahisar Disease Outbreak: बोरिवली - दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरॉसिस यासारख्या साथींच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबईत गेले चार महिने सातत्याने अतिवृष्टी होत आहे.तसेच यावर्षी पावसाचा मुक्काम वाढल्याने बोरिवली - दहिसर विभागात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरॉसिस यासारख्या साथींच्या रुग्णांवर रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या विभागात असलेले मुंबई महानगरपालिकेचे भगवती रुग्णालय हे एकमेव रुग्णालय असून वाढलेल्या रुग्णालयाचा रुग्णांचा भगवती रुग्णालयावर ताण येतो.

रुग्णांचे निदान लवकर होत नसल्याने प्रसंगी रुग्ण दगावण्याचा घटना दहिसर विभागात काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. या संदर्भात उद्धव सेनेच्या विभाग क्र. १ च्या वतीने उपनेते डॉ.विनोद घोसाळकर व माजी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भगवती रुग्णालय व आर मध्य विभाग सहायक महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महापालिकल मुंबई महानगरपालिकेला सदर साथीच्या रोगांबाबत सतर्क राहण्यासाठी आवाहन करून निवेदन दिले.

वाढणाऱ्या रोगराईच्या अनुषंगाने भगवती रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील कॉटस् व डॉक्टरांची संख्या वाढवावी. तसेच गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी जास्तीत जास्त किटस् उपलब्ध कराव्यात. रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारांवरील औषध साठा मुबलक प्रमाणात करून ठेवावा. रुग्ण गंभीर स्वरूपात आजारी असतील तर त्यांना ताटकळत न ठेवता त्यांच्यावर उपचार करावेत. एमआरआय, सिटिस्कॅन सारख्या सुविधा लवकरात लवकर मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भगवती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विरल ठक्कर यांना केले आहे.

मुंबई महानगरपालिका आर उत्तर व आर मध्य विभागाने याबाबत विभागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी.तसेच कीटकनाशक फवारणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी पाणी साठून आजार पसरण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी खड्डे त्वरित बुजवावेत. पर्जन्यवाहिन्यांमधील कचरा साफ करावा. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरे राबवावीत तसेच महापालिका शाळा व खाजगी शाळा व झोपडपट्टी विभागांमध्ये जनजागृती करून नागरिकांना सतर्क करावे असे निवेदन आर- मध्य विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना देण्यात आले.

याप्रसंगी विधानसभा प्रमुख बाळकृष्ण ढमाले, अशोक म्हामुणकर, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, राजू मुल्ला, उपविभागप्रमुख विनायक सामंत, उदय सुर्वे, अमिता सावंत, संघटक तुषार साळुंखे, विधानसभा समन्वयक हेमा तांबट, मानसी म्हातले, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, उत्तम परब, बापूसाहेब गेजगे, गिरीश सावंत, प्रवीण कुवळेकर, अक्षय राऊत, अभिलाष कोंडविलकर, शाखा संघटक दिपाली आवारी ,छाया आमरूळे, नंदा वंजारे, सुप्रिया शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Malaria, Dengue Outbreak in Borivali-Dahisar; Thackeray Group Demands Action

Web Summary : Due to heavy rains, Borivali-Dahisar faces a surge in malaria, dengue, and leptospirosis cases. The Thackeray group urged the Municipal Corporation to take immediate action, increase hospital resources, conduct sanitation drives, and raise public awareness to combat the outbreak.
टॅग्स :आरोग्यमुंबईमहाराष्ट्रशिवसेना