मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 04:21 AM2020-02-26T04:21:17+5:302020-02-26T09:46:04+5:30

टोल कंत्राटदारांकडून मिळणारी रक्कम एमएसआरडीसीच्या काही मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी वापरण्यात येणार

Mumbai Pune Expressway toll rates to go up by 18 percent from April 1 kkg | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून नवे दर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून नवे दर

googlenewsNext

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरामध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. दर तीन वर्षांनी महामार्गावरील टोलमध्ये १८ टक्क्यांनी वाढ करावी, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ साली काढली होती. त्यानुसार ही वाढ करण्यात आलेली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारसाठी आता २३० ऐवजी २७० रुपये द्यावे लागतील. तर मिनी बस ३३५ वरून ४२० रुपये, ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ४९३ वरून ५८० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या बसेससाठी ६७५ रुपयांवरून ७९७ रुपये आणि मोठ्या ट्रकसाठी १,१६५ रुपयांवरून १,३८० ते १,८३५ रुपये अशी वाढ केलेली आहे.

टोल कंत्राटदारांकडून मिळणारी रक्कम एमएसआरडीसीच्या काही मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. एमएसआरडीसीला मिळणाऱ्या महसुलातून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पायाभूत विकासाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुन्हा आयआरबीच
एमएसआरडीसीकडून पुन्हा एकदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १० वर्षे २ महिन्यांसाठी टोल जमा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून एमएसआरडीसीला ८,२६२ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. सध्याच्या टोल वसुलीचा करार हा ऑगस्ट २०१९ मध्येच संपला होता. नवीन करारासाठी आयआरबी ही एमएसआरडीसीला एकरकमी साडेसहा हजार कोटी रुपये देणार आहे, तर उर्वरित रक्कम ही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

Web Title: Mumbai Pune Expressway toll rates to go up by 18 percent from April 1 kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.