Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आणि CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी! २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचाही केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:03 IST

मुंबई पोलिसांतील ट्राफिक कंट्रोलला आज धमकीचा कॉल आला. यात त्या व्यक्तीने पीएम मोदी आणि सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकीही आरोपींनी दिली. यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. 

मुंबई पोलिसांनी सांगितले की, अज्ञातांविरुद्ध भादंवि कलम ५०९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती? अशी आहे आकडेवारी 

गेल्या काही दिवसापूर्वीही मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :मुंबईपोलिसनरेंद्र मोदीयोगी आदित्यनाथ