Join us

Video : दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 13:30 IST

Dadar Flower Market Firing Case: दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

मुंबई : दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला. दादर फुल मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत. मौर्या हा फुल मार्केट परिसरात वजन काटा पुरवण्याचे काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :दादर स्थानकगुन्हेगारीगोळीबार