Join us  

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: शिवसेेना सुसाट; काँग्रेसच्या निरुपमांची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:30 PM

शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांमध्ये सामना

मुंबई: निर्मितीपासून कायम काँग्रेसला हात देणारा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ जिंकण्यात गेल्या निवडणुकीत युतीला यश आलं. विशेष म्हणजे कधीकाळी शिवसेनेत असलेल्या, मुखपत्र सामनाचं संपादक भूषवलेल्या आणि त्यानंतर काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांचा सामना या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना करावा लागला. शिवसेनेच्या या आजी माजी नेत्यांच्या संघर्षात कोणी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 119425 मतं मिळाली असून निरुपम यांच्या पारड्यात 64347 मतं पडली आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम काँग्रेसला कायम यश मिळालं. सुनील दत्त, त्यांची कन्या प्रिया दत्त, गुरुदास कामत याच मतदारसंघातून निवडून गेले. पण गेल्या निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदला. तर या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आपलं सर्व राजकीय वजन हा मतदारसंघ मागून घेतला. 2009 मध्ये भाजपाचे मातब्बर नेते राम नाईक यांचा पराभव करून निरुपम जायंट किलर ठरले होते. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याबद्दल उत्सुकता आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक निकालमुंबई उत्तर पश्चिमकाँग्रेसभाजपासंजय निरुपमगजानन कीर्तीकर