Mumbai Lockdown: मुंबईतील 'नाइट क्लब' सर्वात आधी बंद करू; पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:44 PM2021-03-09T12:44:41+5:302021-03-09T12:45:44+5:30

Mumbai Nightclubs: मुंबईतील 'नाइट क्लब्स'मध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडत असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

Mumbai Nightclubs Might Be Closed Says Aslam Shaikh | Mumbai Lockdown: मुंबईतील 'नाइट क्लब' सर्वात आधी बंद करू; पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत

Mumbai Lockdown: मुंबईतील 'नाइट क्लब' सर्वात आधी बंद करू; पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत

Next

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मुंबईत दिवसागणिक १ हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे शहरात लवकरच काही कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचे संकेतही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले होते. त्यानंतर आज त्यांनी मुंबईतील 'नाइट क्लब'बाबत महत्वाचं विधान केलं आहे.  (Mumbai Nightclubs Might Be Closed Says Aslam Shaikh)

मुंबईतील 'नाइट क्लब्स'मध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. त्यामुळे सर्वात आधी मुंबईतील नाइट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत. 

रात्रीच्या संचारबंदीचीही शक्यता
मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णवाढीचा दर असाच कायम राहीला तर शहरात रात्रीच्या संचारबंदीचाही निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा ठिकाणी कडक निर्बंध करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. 

मास्क न वापरणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून चौपाटी, गेट वे सारखी गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं शेख यांनी स्पष्ट केलं आहे. 
 

Read in English

Web Title: Mumbai Nightclubs Might Be Closed Says Aslam Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.