मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:46 IST2025-10-22T05:45:44+5:302025-10-22T05:46:08+5:30
उन्हाने चटके सोसलेल्या मुंबईकरांना पावसाने भिजवले. हे वातावरण पुढील तीन दिवस असेच राहील.

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंगळवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने आपला मोर्चा मुंबईकडे वळविला. संध्याकाळी पावणेसात दरम्यान पवई, कुर्ला, चेंबूर असा प्रवास करत पाऊस दक्षिण मुंबईत दाखल झाला.
उन्हाने चटके सोसलेल्या मुंबईकरांना मंगळवारी पावसाने भिजवले. हे वातावरण पुढील तीन दिवस असेच राहील. मंगळवारचा पाऊस दक्षिण भारतातील उत्तर पूर्व मान्सूनच्या प्रभावाचा होता, असे अभ्यासक अथ्रेय शेट्टी म्हणाले.
ठाण्यात शेड कोसळले : ठाण्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींमुळे वृंदावन साेसायटीतील इमारत क्रमांक ९०च्या टेरेसवरील पत्र्याची शेड काेसळली. खालून जाणाऱ्या रस्त्यावर काेणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली.