मतदान कार्ड असूनही मतदानापासून वंचित; हक्क हिरावून घेतल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:15 IST2026-01-15T18:14:56+5:302026-01-15T18:15:37+5:30
आपला मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

मतदान कार्ड असूनही मतदानापासून वंचित; हक्क हिरावून घेतल्याचा आरोप
मुंबई : वेळेच्या मर्यादेमुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. त्यातच लता जाधव यांना दुपारी दोन वाजता मतदान केंद्रावर पोहोचूनही मतदान करू देण्यात आले नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ येथील मतदान केंद्रावर त्या दुपारी दोन वाजता गेल्या असता त्यांच्या नावासमोर दोन फुल्या असल्याचे सांगत दुसरे मतदान कार्ड आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्या मुलासोबत सायंकाळी ५.४५ वाजता पुन्हा मतदान केंद्रावर पोहोचल्या, मात्र मतदानाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांना मतदान करू देण्यात आले नाही. त्यामुळे आपला मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, अनेक मतदारांचे म्हणणे आहे की, मागील निवडणुकीत मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती, मात्र यावेळी ती ५.३० वाजेपर्यंतच मर्यादित ठेवल्याने अनेकांना वेळेत मतदान केंद्रावर पोहोचता आले नाही.