कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:07 IST2025-02-07T18:06:31+5:302025-02-07T18:07:48+5:30

महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी कचरा संकलनावर कर आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यातून दरवर्षी सुमारे ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा

Mumbai Municipal Corporation will get Rs 675 crore from waste tax but the law will have to be changed | कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल

कचऱ्यावरील करातून मुंबई मनपाला मिळणार ६७५ कोटी, पण कायद्यात करावा लागेल बदल

मुंबई

महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी कचरा संकलनावर कर आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यातून दरवर्षी सुमारे ६७५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कर आकारण्यास सुरुवात करण्यापूर्वी पालिका विधि विभागाचा अभिप्राय जाणून घेणार आहे. त्यानंतरच या संदर्भातील निर्णय होईल. 

कचरा संकलनासाठी कर आकारायचा असल्यास मुंबई महापालिका कायद्यात बदल करावा लागेल. २०१६ मध्ये केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यात कचरा संकलन कर घेण्याची शिफारस केली होती. किती कर आकारणी करावी, याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना दरमहा १०० रुपये, तर त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या घरांना ५०० रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव आहे. 

का होणार कर आकारणी?
सध्या पालिकेला आर्थिक चणचण जाणवत आहे. पालिका सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी निधीची गरज आहे. मात्र उत्पन्न आणि खर्च यात कमालीची तफावत येत आहे. 

त्यामुळे प्रसंगी मुदत ठेवी मोडण्याची वेळ पालिकेवर येत आहे. महसूल वाढवण्यासाठी उत्पन्नाचे आणखी स्रोत धुंडाळावे लागत आहेत. कचरा संकलन कर त्यासाठीच प्रस्तावित आहे. 

अशी असेल दर महिन्याला प्रस्तावित कर आकारणी
- निवासी- १०० ते ५०० रुपये (घरांच्या क्षेत्रफळानुसार)
- व्यावसायिक आस्थापना, सरकारी कार्यालये, विमा कार्यालये, खासगी क्लास, शैक्षणिक संस्था- ७५० रुपये 
- दवाखाने, क्लिनिक (५० खाटांपेक्षा जास्त)- २००० ते २५०० रुपये. 
- लहान उद्योग (१० किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणारे)- १५०० रुपये. 
- १.७५ लाख कोटी सध्या पालिका सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवत आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. 

अन्य शहरांत सुरू असलेली कर आकारणी
पुणे-

निवासी- १५ ते १५० रुपये
व्यावसायिक आस्थापना रुपये- १०० ते ५०० रुपये
झोपड्या- ५० रुपये
हॉटेल- ५०० रुपये
गॅरेज- १०० रुपये
हॉस्पीटल- ५०० रुपये
दुकाने- २०० रुपये

बंगळुरू
निवासी- ५ ते २०० रुपये
व्यावसायिक- ५०० ते १४,००० रुपये

चेन्नई
निवासी- १० ते १०० रुपये
व्यावसायिक- ३०० ते १५,००० रुपये
मंगल कार्यालये- १०,००० रुपये
हॉटेल व लॉज- ३०० रुपये

Web Title: Mumbai Municipal Corporation will get Rs 675 crore from waste tax but the law will have to be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.