BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:06 IST2025-12-29T17:02:43+5:302025-12-29T17:06:02+5:30
Congress Mumbai Mahanagarpalika Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून लढत असलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत एकूण ८७ उमेदवारांचा समावेश आहे.

BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून लढत असलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत एकूण ८७ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक - २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा…
— Mumbai Congress (@INCMumbai) December 29, 2025
आपली मुंबई घडवूया…
मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया..#Mission2026#Mumbai… pic.twitter.com/y8X1hRLL1m
मुंबई महनगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने नंतर वंचित बहुजन आघाडीसोबत लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी काँग्रेस आणि प्रकास आंबेडकर यांचा पक्ष एत्र आला आहे. वंचित बहुजन आघाडीला मुंबई महानगरपालिकेतील २२७ पैकी ६२ जागा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि काँग्रेसचे इतर मित्र पक्ष निवडणूक लढणार आहेत.
दरम्यान, एकता, संघटन आणि जमिनीवरच्या तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर, मुंबई काँग्रेस या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी आणि निर्धाराने उतरली आहे. आम्ही सामान्य मुंबईकरासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढू. निवडणूक आव्हानात्मक आहे, ही लढाई आहे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी, ही लढाई आहे लोकशाही रक्षणासाठी! पण मुंबईकर आमच्यासोबत आहे आणि विजय आमचाच होईल, असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ंमुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.