घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:05 IST2025-11-11T15:01:52+5:302025-11-11T15:05:15+5:30
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात झाली आहे. या वॉर्ड आरक्षणाकडे अनेक माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं लक्ष लागून होतं.

घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
मुंबई
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात झाली आहे. या वॉर्ड आरक्षणाकडे अनेक माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं लक्ष लागून होतं. आजच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. तर अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. उदाहरणार्थ, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक १ यंदाच्या सोडतीत मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेजस्विनी यांना यंदा वॉर्ड क्रमांक १ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही. तर दुसरीकडे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे असं म्हणता येईल. कारण पेडणेकर या २०१७ साली ज्या वॉर्ड क्रमांक १९९ मधून निवडून आल्या होत्या तो वॉर्ड यंदाही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव घोषीत झाला आहे.
आरक्षण सोडतीत धक्का बसलेल्यांमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांचाही समावेश आहे. नील सोमय्या यांचा वॉर्ड क्रमांक १०८ यंदा मागासवर्ग (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यासोबतच माजी नगरसेवक आणि मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वॉर्ड क्रमांक १७६ यंदा मागासवर्ग (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांचा वॉर्ड यंदाच्या निवडणुकीसाठी महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं मोठा धक्का मानला जात आहे. तर गीता गवळी, राखी जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण या दोन्ही प्रतिनिधीत्व करत असलेले वॉर्ड महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.
मुंबई मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे...
अनुसुचित जाती वॉर्ड क्रमांक-
26,93,140,141,146,152,215
अनुसुचित जाती (महिला) वॉर्ड क्रमांक-
118,133, 147, 151, 183, 186,189, 155,
अनुसुचित जमाती वॉर्ड क्रमांक-
53
अनुसुचित जमाती (महिला) वॉर्ड क्रमांक-
121
नागरिकांचा मागस प्रवर्ग (ओबीसी) वॉर्ड क्रमांक-
4,10,41,45,50,63,69,70,76,85,87,91,95,106,111,113,130,135,136,137,138,171,182, 187,193,195,208,219,222,223,226
नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) महिला वॉर्ड क्रमांक-
1,6, 11,12, 13,18,19,27,32,33,46,49,52,72,80,82,100,105,108,117,128,129,150, 153,158,167,170,176,191,198,216
सर्वसाधारण खुला गट महिला वॉर्ड क्रमांक-
2,8,14,15,16,17,21,24,28,31,37,38,39,42,44,51,56,60,61,64,66,71,73,74,77,78,79, 81,83,84,88,94,96,97,101,103,110,112,114,115,116,124,126,127,131,132,134,139,142,143,156,157,163, 172,173,174,175,177,179,180,184,196,197,199,201,203, 205,209,212,213,218,220,224,227
सर्वसाधारण खुला गट वॉर्ड क्रमांक- (७५ जागा)
3,5,7,9,20,22,23,25,29,30,34,35,36,40,43,47,48,54,55,57,58,59,62,65,67,68,75,86,89,90,92,98,99,102,104,106,107,109,119,120,121,122,123,125,144,145,148,149,154,159,160,161,162,164,165,166,168,169,178,181,185,188,190,192,194,200,202,204,206,207,210,211,214,217,225