मुंबई महानगरपालिका जी/दक्षिण विभाग; राजकीयदृष्ट्या चर्चेचा वॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:05 AM2023-12-20T10:05:01+5:302023-12-20T10:07:05+5:30

मुंबईतील राजकीय परिस्थितीच्या मध्यवर्ती असणारा वरळीचा परिसर जी/दक्षिण विभागात आहे.

Mumbai muncipal corporation G/South Division politically active ward in mumbai | मुंबई महानगरपालिका जी/दक्षिण विभाग; राजकीयदृष्ट्या चर्चेचा वॉर्ड

मुंबई महानगरपालिका जी/दक्षिण विभाग; राजकीयदृष्ट्या चर्चेचा वॉर्ड

मुंबईतील राजकीय परिस्थितीच्या मध्यवर्ती असणारा वरळीचा परिसर जी/दक्षिण विभागात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकारण्यांचे लक्ष यावर असते. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची कायमच रेलचेल दिसून येते. महालक्ष्मी रेसकोर्स हे २२५ एकरमध्ये पसरलेले मोठे मैदान आहे. तर हाजीअली दरवाजा एक मस्जिद व दर्गा आहे जो दक्षिण भागात वरळीच्या किनाऱ्यावर आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम :

काकासाहेब गांगील मार्ग
काशिनाथ धुरू रोड, हाजीअली
केशवराव खाड्ये मार्ग
संत गाडगे महाराज चौक

या विभागातील वरळीवर सर्व राजकारण्यांचे लक्ष असते. याखेरीस, या विभागात आता अनेक सेलिब्रिटीही राहायला असल्याने वेगळे वलय निर्माण झाले आहे.

दिपीका पदुकोण, विराट कोहली यांसारखे दिग्गज येथे राहतात. बॉलीवूडसह अनेक लघुपट, मालिकांचे चित्रिकरणही वरळी कोळीवाड्यात होत असल्याने याची क्रेझ स्थानिकांमध्ये आहे.

वरळी प्रीमियम अपार्टमेंट्स आणि वैविध्यपूर्ण मालमत्ता मूल्यांकनांसह विविध व्यावसायिक आस्थापना देते. रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या शोधामध्ये असलेल्या सेलिब्रेटींसाठी एक पसंतीचे स्थान असून ते पायाभूत सुविधा आणि उच्च-उंची संरचनांनी भरलेले आहे. अनुष्का शर्मा, युवराज सिंग आणि शाहिद कपूर हे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे वरळीमध्ये मालमत्ता आहे.

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

किशोरी पेडणेकर : वॉर्ड क्र. १९१ 
हेमांगी वरळीकर : वॉर्ड क्र. १९३ 
समाधान सरवणकर : वॉर्ड क्र. १९४ 
संतोष खरात : वॉर्ड क्र. १९५ 
आशिष चेंबूरकर : वॉर्ड क्र. १९६ 
दत्ता नरवणकर : वॉर्ड क्र. १९७ 
स्नेहल आंबेकर : वॉर्ड क्र. १९९ 

मुंबईतील राजकारणाच्या दृष्टीने येथील वरळी परिसर हा अत्यंत चर्चेचा मानला जातो. याखेरीज, या विभागात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. त्याचप्रमाणे, वरळी कोळीवाड्यांच्या पुनर्विकास हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे.- संतोषकुमार धोंडे, सहायक पालिका आयुक्त

शैक्षणिक संस्था :

सिक्रेट हार्ट हायस्कूल,
जी.के. मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल,
होली क्राॅस हायस्कूल,
बाबासाहेब गावडे हायस्कूल
मराठा हायस्कूल,

पर्यटनस्थळे : हाजीअली, महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी सीफेस 

२ डिस्पेन्सरी :टिळक रुग्णालय, कामगार रुग्णालय, पोद्दार रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय

Web Title: Mumbai muncipal corporation G/South Division politically active ward in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.