मुंबई इन मिनिट्स; मेट्रोसाठी शंटिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 04:04 IST2020-12-07T04:00:09+5:302020-12-07T04:04:31+5:30

Mumbai Metro News : इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधने ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करतील. रोड कम-रेल-मूव्हर (आरएमएम) आणि डिझेल शंटिंग लोको हे चारकोप मेट्रो डेपो कार्यशाळेत इलेक्ट्रिक मेट्रो ट्रेनच्या देखभालीसाठीचे ८ कार ट्रेन सेट खेचण्यास मदत करतील.

Mumbai in minutes; Shunting operation for metro | मुंबई इन मिनिट्स; मेट्रोसाठी शंटिंग ऑपरेशन

मुंबई इन मिनिट्स; मेट्रोसाठी शंटिंग ऑपरेशन

मुंबई : चारकोप मेट्रो डेपोसाठीच्या नवीन रोड-रेल शंटर लोको आणि मूव्हरचे उद्घाटन एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी शनिवारी केले. इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधने ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करतील. रोड कम-रेल-मूव्हर (आरएमएम) आणि डिझेल शंटिंग लोको हे चारकोप मेट्रो डेपो कार्यशाळेत इलेक्ट्रिक मेट्रो ट्रेनच्या देखभालीसाठीचे ८ कार ट्रेन सेट खेचण्यास मदत करतील.
चारकोप मेट्रो डेपो येथे ही लोकोमोटिव्ह सुरू करणारी आदिश्री ठाकरे ही पहिली ट्रेन ऑपरेटर आहे.  आरएमएम आणि रोड-कम-रेल डिझेल शंटिंग लोको हे विविध वैशिष्ट्ये आणि प्रगत सुरक्षा उपायांनी सुसज्ज आहेत. महत्त्वपूर्ण अशा देखभाल कामासाठी तसेच मेट्रो गाड्यांची कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होईल. यातून सुरक्षित आणि सुलभ प्रवास निश्चित होण्याबरोबरच एमएमआरडीएचे मुंबई इन मिनिट्स हे ध्येय साध्य करण्यास मदत होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
रेल कम रोड मूव्हर हे बॅटरीचलित आहे. स्वतंत्र कारचे शंटिंग ऑपरेशन म्हणजे बाजूच्या रुळावर नेण्याची प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. तर रोड कम रेल डिझेल शंटिंग लोकोमुळे ट्रेनचे सेट, वैयक्तिक कारची विद्युतविहीन अवस्थेत हालचाल करणे किंवा त्याला वाहून नेणे शक्य होईल. हे रेल्वे तसेच रोडवर काम करू शकते.

Web Title: Mumbai in minutes; Shunting operation for metro