Join us  

मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:52 PM

Mumbai Metro Work : पश्चिम उपनगर तसेच मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जातील

मुंबई : एमएमआरडीएने ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्क जाळ्याचे काम वेगाने सुरु केले आहे. २०२६ पर्यंत हे पूर्ण करायाचे आहे. याचाच भाग म्हणून मेट्रोदहिसर ते मिरा भाईंदर आणि मेट्रो ७-अ पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे पश्चिम उपनगर तसेच मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जातील. सोबतच मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर हे भाग मेट्रोने एकमेकांना जोडले जातील.

पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेस असलेल्या सर्व्हिस रोडवर पांडुरंग वाडी स्थानक बनविण्याचा विचार होता. मात्र महापालिकेने जकातीच्या मोकळ्या जागेत प्रवेशद्वाराजवळ आर-नॉर्थ वॉर्डमध्ये विकास करायचे योजले असल्याने हे स्थानक पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पूर्वेस जकात नाक्याच्या बाजूला होईल. नवीन स्थानकाच्या स्थानाच्या बदलामुळे १५० गाळ्यांसाठीचे भूमी अधिग्रहण, आरअँडआरमुळे  काम पूर्ण करण्यात होणारा विलंब टाळता येईल. या स्थानकाचा वापर प्रस्तावित असलेल्या मेट्रो-१० साठी टर्मिनस म्हणूनही केला जाऊ शकेल. त्याने गायमुख आणि शिवाजी चौक हे भाग जोडले जातील. अशाप्रकारे मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर हे भाग मेट्रोने एकमेकांना जोडले जातील.

------------------

मेट्रो ९ - मेट्रो ९ चे संरेखन दिल्ली मेट्रो रेल कॉपोरेशन दिलेल्या डीपीआरच्या आधारे करण्यात आले आहे.- हे संरेखन पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पूर्वेस असलेल्या ओव्हरी पाड्याला तिरपे जाऊन, टोल प्लाझाला मध्य रेषेत येते.- कमानीआधी पश्चिममेस जाते. यामध्ये अनेक प्रवेशद्वारांचा समावेश पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडण्यासाठी  कमानीतून करण्यात आला आहे.- ही कमान एमसीजीएमद्वारे दहिसर चेक नाका येथे बांधण्यात आली.- या संरेखनात पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेस, दहिसर ते पांडुरंग वाडी या दरम्यान दीडशेहून अधिक गाळे बनवायचे आहेत.- यात हॉटेल आणि रेस्टॉरंटचा समावेश आहे.

------------------

मेट्रो ९ : दहिसर-मीरा भाईंदर

११ किलो मीटरची ८ स्थानके असलेली मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) पर्यंत विस्तारित आहे. ही दोन टप्प्यात बांधली जात आहे. पहिला टप्पा ७ आहे. जो १६.५ किमी आहे.  टप्पा दोन हा दोन भागांमध्ये आहे. सीएसएमआयए विमानतळ अंधेरी पूर्व (ज्याला मेट्रो ७-अ म्हणतात) सुमारे ३.५ किमी (२ स्थानकांचा समावेश आहे) पुढे दहिसर ते पुढील मीरा भाईंदर (मेट्रो-९) ९ आणि ७ अ या दोन्हीचे काम सुरु आहे.

------------------

 

 

टॅग्स :एमएमआरडीएमुंबईमीरा-भाईंदरदहिसरमेट्रो