Join us
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 15:33 IST

मुंबई मेट्रो रेल्वेची घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई - मुंबईमेट्रो रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दुपारी घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मेट्रो रेल्वे जागृतीनगर स्थानकात थांबवण्यात आली. त्यामुळे घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रोची वाहतूक ठप्प झाली आहे. आज दुपारी घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी मेट्रो जागृतीनगर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आली. त्यामुळे वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोच्या वाहतुकीचा खोळंबा सुरू झाला. दरम्यान, मेट्रोची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :मुंबईमेट्रो