'तिनं' प्रेमाला नकार दिला, एक्स-बॉयफ्रेंडने डोक्यात दगड घालून केली हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 11:53 AM2019-01-25T11:53:27+5:302019-01-25T12:09:40+5:30

अंधेरी परिसरात आसमा निसार शेखची (वय २५ वर्ष) निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अल्लरखाला डीएन नगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai : Man who smashed girlfriend’s head with stone held, accused arrested by D N Nagar police | 'तिनं' प्रेमाला नकार दिला, एक्स-बॉयफ्रेंडने डोक्यात दगड घालून केली हत्या!

'तिनं' प्रेमाला नकार दिला, एक्स-बॉयफ्रेंडने डोक्यात दगड घालून केली हत्या!

Next
ठळक मुद्देडोक्यात दगड घालून तरुणीची निर्घृण हत्या कर्नाटकातून आवळल्या आरोपीच्या मुसक्याप्रेम संबंधांना नकार दिल्यानं तरुणीची हत्या

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - अंधेरी परिसरात आसमा निसार शेखची (वय २५ वर्ष) निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अल्लरखाला डीएन नगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. प्रेम संबंधाला नकार दिल्याच्या रागात आसमा शेखची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कर्नाटकातून आरोपी अल्लरखाच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे. 

काही दिवसांपूर्वी आसमा शेखसोबत अल्लारखाचे ब्रेकअप झाले होते. त्याला पुन्हा आसमासोबत प्रेम संबंध प्रस्थापित करायचे होते. मात्र तिनं यास नकार दिला. याचा राग मनात ठेऊन अल्लारखानं आसमाच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर तो फरार झाला होता. घरकाम करणाऱ्या शेखची हत्या का करण्यात आली असावी, याचा शोध पोलीस घेत होते. याप्रकरणी, तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठीही ताब्यात घेतले होते.  

आरोपी अल्लरखा कर्नाटकला पसार झाल्याची माहिती डी एन नगर पोलिसांच्या पथकाला मिळाली आणि त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गिलबर्ट हिल परिसरातून गेल्या शुक्रवारपासून शेख बेपत्ता होती. त्यानंतर गिलबर्ट हिलच्या जंगलात तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. याप्रकरणी डी एन नगर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा मुख्य आरोपीच्या मागावर होते. यानंतर डीएन नगर पोलिसांनी तपासची चक्र फिरवत आरोपी अल्लारखाला गजाआड केले. 

 

Web Title: Mumbai : Man who smashed girlfriend’s head with stone held, accused arrested by D N Nagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.