मुंबईतील मानखुर्द परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली. विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेत मृताचा मित्रही गंभीर जखणी झाला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजू रोक (वय, २५) आणि त्याचा मित्र इंदू (वय, २७) राहत असलेल्या भाड्याच्या घरात घडली. वरच्या आणि खालच्या मजल्यावरील भाडेकरूंमध्ये वीज जोडणीच्या तारांवरून किरकोळ वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. सुमारे १० जणांच्या गटाने राजू आणि इंदू यांच्यावर अचानक काठ्या आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात राजू रोक गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला इंदू याच्यावरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नऊ जणांना अटक, एक अद्याप फरार
मयत राजू रोक हा नुकताच उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून मुंबईत आला होता आणि तो मजूर म्हणून काम करत होता, अशी माहिती आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. तर, फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली.
पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत आणि परिसरात तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मानखुर्द परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Web Summary : A 25-year-old man was murdered in Mumbai's Mankhurd over an electricity wire dispute. Nine have been arrested; one is absconding. The victim, recently from Lucknow, was attacked with his friend, who is critically injured. Police are investigating.
Web Summary : मुंबई के मानखुर्द में बिजली के तार जोड़ने को लेकर विवाद में एक 25 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। नौ लोगों को गिरफ्तार किया गया है; एक फरार है। लखनऊ से हाल ही में आए पीड़ित पर उसके दोस्त के साथ हमला किया गया, जो गंभीर रूप से घायल है। पुलिस जांच कर रही है।