Mumbai Malad Fire : मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 19:16 IST2023-03-13T19:16:18+5:302023-03-13T19:16:39+5:30
सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि काही क्षणातच परिसरात पसरली.

Mumbai Malad Fire : मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक
मुंबई:मुंबईतील मालाड पूर्वमधील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मालाडमधील आप्पा पाडा परिसरात ही झोपडपट्टी असून, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे.
मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग; अनेक घरं जळून खाक#fire#Mumbaipic.twitter.com/jVX0lAOxXY
— Lokmat (@lokmat) March 13, 2023
सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आणि 100 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. आग लागल्यानंतर आगीचे लोळ परिसरात पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते.