मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:51 IST2025-04-12T18:51:55+5:302025-04-12T18:51:55+5:30
मुंबईत रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक!
अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी (१३ एप्रिल २०२५) मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार स्थानकांवर अप आणि डाउन स्लो मार्गावर आणि कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर असेल. या कालावधीत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच रविवारी घराबाहेर पडावे.
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.०० वा. ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
- सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ वा. ते दुपारी ०३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकदरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
- घाटकोपर येथून सकाळी १०.१९ वा. ते दुपारी ०३.२९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि आणि मशीद या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत.
डाऊन धीम्या मार्गावर
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.०७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०३.४० वाजता सुटेल.
कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.१० वा. ते दुपारी ०४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल
- सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ वा. ते दुपारी ०३.३६ वा. पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी पर्यंतच्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.१६ वा. ते दुपारी ०३.४७ वाजेपर्यंत बंद राहतील.
ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरळ स्थानकांवरून सकाळी १०.०० वा. ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.