Join us

Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:55 IST

Mumbai Local Train Services Disrupted: मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Mumbai Local Train Update: मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, आणि टिळक नगर यांसारख्या परिसरांमध्ये रुळांवर पाणी आल्याने मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे कुर्ला आणि टिळक नगर दरम्यानच्या लोकल गाड्या ८ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस असूनही लोकल सेवा अद्याप थांबवण्यात आलेली नाही. मात्र, कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण या मार्गांवर कमी दृश्यमानतेमुळे रेल्वे गाड्यांना ८ मिनिटांपर्यंत उशीर होत आहे. 

पश्चिम रेल्वे सुरळीतत्याउलट, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "तुम्हाला तुमच्या कार्यालयात जायचे असो किंवा प्रियजनांना भेटायचे असो, पश्चिम रेल्वेचा प्रत्येक कर्मचारी तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे."

रेड अलर्ट आणि शाळांना सुट्टीभारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी मंगळवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईमहाराष्ट्रपाऊसमध्य रेल्वेहार्बर रेल्वेमुंबई ट्रेन अपडेट