मुंबई लोकलमध्ये डोळा गमावल्याची घटना, दगडफेक करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:34 IST2026-02-06T14:33:39+5:302026-02-06T14:34:18+5:30

Bandra Local train crime news: दोघांच्या भांडणात तिसऱ्या तरुणाचा फुटला डोळा, दृष्टी गमावली

mumbai local train crime man left blind from one eye angry accused arrested who stone pelted | मुंबई लोकलमध्ये डोळा गमावल्याची घटना, दगडफेक करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आरोपीला अटक

मुंबई लोकलमध्ये डोळा गमावल्याची घटना, दगडफेक करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आरोपीला अटक

Bandra Local train crime news: मुंबई लोकल ट्रेनच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांच्या वादात एका अज्ञाताने दुसऱ्यावर फेकलेला दगड तिसऱ्याच तरुणाला लागून त्या प्रवाशाचा एक डोळा कायमचा निकामी झाला. निशांत रत्नाकुमार खत्री (२८) असे त्याचे नाव आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी (GRP) या प्रकरणी अज्ञात प्रवाशाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेणे सुरु होते. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. योगेंद्र बौड असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशच्या आझमगडचा आहे.

नेमकी घटना काय?

निशांत रत्नाकुमार खत्री दादरचा रहिवासी आहे. निशांतने एमबीए (MBA) केले असून तो एका खासगी कंपनीत अकाउंट्स विभागात काम करतो. बुधवारी रात्री १०:४० च्या सुमारास निशांत अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकलने घरी परतत होता. डब्यात दोन प्रवाशांमध्ये कशावरून तरी जोरात भांडण सुरू होते. ट्रेन रात्री ११ च्या सुमारास वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पोहोचली. तेव्हा भांडण करणाऱ्यांपैकी एक जण खाली उतरला आणि त्याने रेल्वे ट्रॅकवरील दगड उचलून डब्यात असलेल्या दुसऱ्या प्रवाशावर फेकला. पहिला दगड ट्रेनला लागला, पण त्याने दुसरा दगड पुन्हा जोरात फेकला. हा दुसरा दगड त्या प्रवाशाला न लागता तिथे बसलेल्या निशांत खत्रीच्या डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला. यामुळे निशांतचा डोळा रक्तबंबाळ झाला होता.

वेळेत उपचार न मिळाल्याने एक डोळा गमावला 

निशांतने दिलेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत कोणीही त्याची साखळी ओढून मदत केली नाही. त्याला स्वतः चालत स्टेशन मास्तरांच्या ऑफिसपर्यंत जावे लागले. तिथेही त्याला ४५ मिनिटे ताटकळत बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला भाभा रुग्णालय आणि नंतर हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला इतका विलंब झाला की डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी आता परत येऊ शकत नाही.

Web Title : मुंबई लोकल: पत्थरबाजी में आँख गंवाई, यूपी का आरोपी गिरफ्तार

Web Summary : मुंबई के बांद्रा स्टेशन पर झगड़े में एक व्यक्ति ने पत्थर फेंका जिससे निशांत खत्री की आँख में चोट लगी। उनकी एक आँख खराब हो गई। पुलिस ने उत्तर प्रदेश के योगेंद्र बौड को गिरफ्तार किया है।

Web Title : Mumbai Local: Man Loses Eye; UP Stone-Pelter Arrested

Web Summary : A man lost an eye after being hit by a stone during a fight at Bandra station. Nishant Khatri was injured when an attacker threw a stone at another passenger but hit him instead. Police arrested Yogendra Boud from Uttar Pradesh.