अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 22:44 IST2025-11-07T22:19:27+5:302025-11-07T22:44:33+5:30
Mumbai Local Train Accident : काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने काल गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सायंकाळी आंदोलन केले.

अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
काही दिवसापूर्वी मुंब्रा येथे रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यानंतर या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने काल गुरुवारी आंदोलन केले होते. आंदोलनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकल बंद असल्याने लोक रेल्वे रुळावरूनच चालत जात होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या लोकलने चार प्रवाशांना उडवले. यात दोन जणांचा मृत्यू झाला.
या अपघातामध्ये एका आईचा आणि मुलीचा समावेश होता. सायंकाळी गर्दीच्या वेळीच रेल्वे मजदूर संघाने सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरू केले. यामुळे सर्वच गाड्या जागीच ठप्प झाल्या. किमान तासभर रेल्वेसेवा ठप्प होती. यामुळे रेल्वेस्थानकांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. ण्डहर्स्ट रेल्वे स्थानकातही तिच परिस्थिती होती. बराचवेळ गाडी जाग्यावरुन हालत नाही म्हणून प्रवाशांनी रेल्वे रुळावरुन चालत जाण्यास सुरुवात केली. पण, यावेळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट गाडीने पाच प्रवाशांना उडवले.
अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला तर, दोघे गंभीर जखमी झाले. एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातील एका मृताची ओळख पटलेली नाही, हेली मोहमाया तरुणीचा यामध्ये मृत्यू झाला.या तरुणीची आई खुशबू मोहमाया या गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमींची नावे अशी
याफिजा चोगले (६२), कैफ चोगले हे किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.