Join us  

'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 4:57 PM

मुंबईतील कुर्ला परिसरात काल मध्यरात्री चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई:मुंबईतीलकुर्ला परिसरात चार मजली इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 10 वर पोहोचला आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली होती. कुर्ल्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली तिथले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली.  मतदारसंघात इतकी मोठी घटना घडली आणि तिथे जाता येत नसल्याने आमदार मंगेश कुडाळकर भावूक झाल्याची माहिती बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी दिली. 'माझ्या मतदारसंघात इमारत पडली आणि मी तिथे जाऊ शकत नाही,' असे मंगेश कुडाळकर म्हणाल्याचे केसरकर यांनी सांगितले. मृतांचा आकडा 10 वर, 13 जखमीमुंबईतील कुर्ला परिसरात काल मध्यरात्री चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 10 वर पोहोचला आहे, तर जखमींची संख्या 13 वर आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं पोहोचली. एनडीआरएफच्या जवनांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते.

टॅग्स :अपघातइमारत दुर्घटनामुंबईकुर्लाशिवसेना