"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:56 PM2022-11-18T17:56:26+5:302022-11-18T17:59:51+5:30

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याकडे लक्ष वेधले

"Mumbai is not a hen that lays golden eggs, for us it is our homeland-workplace, Says aditya Thackeray on mumbai muncipal corporation | "मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी"

"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी"

googlenewsNext

मुंबई - शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सध्या मुंबई महापालिकेतील काराभारावरुन तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते टेंडर निघालंही होतं. मात्र, आता ते डेंटर रिकॉल करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच, सध्या मुंबई महापालिकेतील कामकाजावर कोणाचं नियंत्रण आहे, कोण येथील प्रशासन चालवत आहे, येथील कामकाजाच्या कागदांवर कोणाच्या सह्या होत आहेत? असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच, मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण आमच्यासाठी नाही, असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.  

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याकडे लक्ष वेधले. महापालिकेतील कामकाजावर कोणाच्या सह्या होत आहेत. कोण येथील निविदा प्रक्रिया आणि विकास कामांच्या ऑर्डर देत आहे? असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुंबईतील रस्त्यांसाठी काढण्यात आलेल्या 5 हजार कोटींच्या टेंडरचं काय झालं, हे टेंडर का रिकॉल करण्यात आले, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबई महापालिकेत सध्या ३ टी वर काम सुरू आहे. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास या तत्त्वावर सध्या मुंबई महापालिकेचं कामकाज सुरू आहे. खोके सरकारकडून सध्या महापालिकेतील कामावर कुठलीही स्पष्टता आलेली नाही. गेल्या ३ महिन्यात मुंबईत किती इन्फास्ट्रक्चरची कामे करण्यात आली, त्याला मंजुरी कोणी दिली, त्याची प्रक्रिया कशी झाली, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.  

नगरसेवकांच्या हक्काच्या १७०० कोटी रुपयांचीही गडबड झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबईला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला, मुंबईला नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच मुंबईचं खच्चीकरण करण्याचं काम खोके सरकारकडून होत आहे. मुंबई महापालिकेत सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३ व ४ महिन्यात केल्या जात आहेत. खोके सरकारकडून केवळ टाइमपास सुरू आहे. मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण ती आमच्यासाठी आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे. त्यामुळेच, आमच्या महाविकाआघाडी सरकारमध्ये मुंबईतून ५ जणांना मंत्री करण्यात आलं होतं. मुंबईतील विकासकामांवरही भर देण्यात आला होता, असे आदित्य यांनी सांगितले.  

Web Title: "Mumbai is not a hen that lays golden eggs, for us it is our homeland-workplace, Says aditya Thackeray on mumbai muncipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.