Join us

Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:31 IST

IIT Bombay Student Suicide: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली.

आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची सांगण्यात आले. त्यानुसार, पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून  पोलीस अधिक तपासाला सुरुवात केली आहे.

रोहित सिन्हा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहित हा मूळचा दिल्लीचा रहिवासी होता आणि तो मेटलर्जिकल सायन्सेस फॅकल्टीमध्ये चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलसांना देण्यात आली. शैक्षणिक ताणतणावातून रोहितने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती आहे. पवई पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमहाराष्ट्र