मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:03 IST2018-12-19T23:24:43+5:302018-12-20T00:03:26+5:30
मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथील बसमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
मुंबई - मुंबईतीलहॉटेल ट्रायडंट येथील बसमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरात हे पंचतारांकित हॉटेल असून या हॉटेलमधील खालच्या बाजूस असलेल्या लहान दुकानातून ही आग भडकली आहे. सध्या, आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.
अंधेरी येथील कामगार रुग्णालयात सोमवारीच भीषण आग लागली होती. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आणखी एक आगीची घटना मुंबईत घडली आहे. येथील हॉटेलच्या बेसमेंटमध्ये एका दुकानाला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर, ती वाढत गेली होती.
Visuals from Mumbai: Fire breaks out in Trident Hotel at Nariman Point. More details awaited. #Maharashtrapic.twitter.com/PtEEoW3MB1
— ANI (@ANI) December 19, 2018