Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:43 IST2024-09-25T18:41:23+5:302024-09-25T18:43:52+5:30
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पूर्व उपनगरात दुपारपासून तुफान पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे.

Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पूर्व उपनगरात दुपारपासून तुफान पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्याला नदीचं रुप प्राप्त झालं आहे. भांडूप, मुलुंड परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तर रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.
भांडूपच्या व्हिलेज रोड परिसरात तर रस्त्याला अक्षरश: नदीचं रुप आलं आहे. तर मुलुंडच्या त्रिमूर्ती मार्गावरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भांडूप, मुलुंडसह घाटकोपर, कांजुरमार्ग, पवई, एलबीस रोड भागालाही पावसाने झोडपून काढलं आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. उद्याही मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.