मुसळधार पावसामुळे एरंगळ येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 14:35 IST2018-06-25T14:35:24+5:302018-06-25T14:35:40+5:30
मालाड पश्चिम येथे काल मुंबईतील सर्वात जास्त 110 मिमी पाऊस पडला. काल मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसात आज सकाळी 8 च्या सुमारास मालाड पश्चिम एरंगळ येथील बस स्टॉप जवळ भास्कर भोपी मार्गावर सुमारे 150 वर्षीय पूरातन वडाचे झाड कोसळले

मुसळधार पावसामुळे एरंगळ येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा
मुंबई - मालाड पश्चिम येथे काल मुंबईतील सर्वात जास्त 110 मिमी पाऊस पडला. काल मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसात आज सकाळी 8 च्या सुमारास मालाड पश्चिम एरंगळ येथील बस स्टॉप जवळ भास्कर भोपी मार्गावर सुमारे 150 वर्षीय पूरातन वडाचे झाड कोसळले, मात्र कोणतीही जावीत हानी झाली नाही.
मात्र मढ जेट्टी ते मालाड स्टेशन मुख्य मार्गावर असलेल्या एरंगळ येथे झाड कोसळल्याने येथील
वाहतूक सुमारे चार तास बंद होती.त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे खूप हाल झाले.
अखेर पी उत्तर विभागाच्या उद्यान खात्याचे सहाय्यक उद्यान अधिक्षक हनुमंत गोसावी व त्यांचे सहकारी मुकेश पवार,अग्निशामक दल व मालवणी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून 4.15 तासा नंतर येथील पडलेले वडाचे झाड दूर करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.येथील काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या मार्गदर्शना खाली येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदर झाड लवकर काढण्यासाठ आणि येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले अशी माहिती काँग्रेस चे ब्लॉक क्रमांक 49 चे अध्यक्ष अँड.विक्रम कपूर यांनी दिली.