Mumbai Heat Wave: मुंबईकरांनो, सांभाळा! तापमानाचा पारा ३६.३ अंशांवर; 'संडे' ही तापदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 07:16 IST2026-02-22T07:12:57+5:302026-02-22T07:16:15+5:30

Mumbai weather forecast: शहर व उपनगरांमध्ये कडक ऊन व गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागला.

Mumbai Heat Wave: Mumbaikars, take care! Temperature at 36.3 degrees; 'Sunday' is a heatwave | Mumbai Heat Wave: मुंबईकरांनो, सांभाळा! तापमानाचा पारा ३६.३ अंशांवर; 'संडे' ही तापदायक

Mumbai Heat Wave: मुंबईकरांनो, सांभाळा! तापमानाचा पारा ३६.३ अंशांवर; 'संडे' ही तापदायक

मुंबई : मुंबईत शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३६.३ अंश सेल्सिअस होता. या हंगामातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. पुढील दोन दिवस तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शहर व उपनगरांमध्ये कडक ऊन व गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागला. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हाचा चटका अधिक होता. रविवारीही असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

महामुंबईतील तापमान

मुंबई ३६.३, कर्जत ३८.४, डोंबिवली ३८.३, पनवेल ३८.३, खारघर ३८.१, कल्याण ३७.८, बदलापूर ३७.८, वसई ३७, ठाणे ३७, नेरूळ ३६.४.

तापमानात वाढ कशामुळे झाली?

पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. मंगळवारनंतर काहीसा बदल होऊन मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

"२१ फेब्रुवारी रोजी मुंबईने कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभरात नोंदवलेले कमाल तापमान हे सरासरीपेक्षा सुमारे ४ अंशांनी अधिक होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उकाड्याची तीव्रता जाणवू लागली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी काळजी घ्यावी", अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.  

Web Title : मुंबई में भीषण गर्मी: तापमान 36.3 डिग्री सेल्सियस तक पहुंचा

Web Summary : शनिवार को मुंबई का अधिकतम तापमान 36.3 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जो इस मौसम का सबसे अधिक है। तापमान अधिक रहने की संभावना है। नागरिकों को गर्मी और गर्म हवाओं का सामना करना पड़ा। विशेषज्ञों ने दोपहर में धूप से बचने की सलाह दी है। मंगलवार के बाद राहत मिलने की उम्मीद है।

Web Title : Mumbai Scorches: Heatwave Grips City, Temperatures Soar to 36.3°C

Web Summary : Mumbai experienced a high of 36.3°C on Saturday, the highest this season. Temperatures are expected to remain high. Citizens faced heat and hot winds. Experts advise avoiding midday sun. Relief is expected after Tuesday.