Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:16 IST2024-05-11T13:14:53+5:302024-05-11T13:16:52+5:30
Mumbai Pali Hill Fire: आगीत संपूर्ण बंगला जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. बंगल्यातील सिलिंडरचा स्फोट झाल्यानं आगीचे लोट वाढले आणि परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला.

Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
मुंबईतील पाली हिल परिसरात नारायण बंगला येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बंगला जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. बंगल्यातील सिलिंडरचा स्फोट झाल्यानं आगीचे लोट वाढले आणि परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला.
सिलिंडरच्या स्फोटाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यातून आगी किती भीषण होती याची कल्पना येते. अग्नितांडव सुरु असतानाच सिलिंडरचा स्फोट होऊन आगडोंब उसळलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
VIDEO: मुंबईच्या पाली हिल येथे एका बंगल्यात भीषण आग, सिलिंडर स्फोटाने उडाला थरकाप #Palihill#MumbaiFirepic.twitter.com/tnRmwa2LeC
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) May 11, 2024
इलेक्ट्र्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. यात संपूर्ण बंगल्याचं नुकसान झालं आहे. बंगल्यातील फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, गॅस सिलिंडर, लाकडी सामान, फॉल सिलिंग, एसी यूनिट्स इत्यादी सर्व जळून खाक झालं आहे. बंगल्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा मजला पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडला होता. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.