Mumbai Electricity Cut: केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार; वीजपुरवठाबाबत राज्य सरकारल मार्गदर्शन करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 22:38 IST2020-10-12T22:38:18+5:302020-10-12T22:38:54+5:30
राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता, असे त्यांनी सांगितले.

Mumbai Electricity Cut: केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार; वीजपुरवठाबाबत राज्य सरकारल मार्गदर्शन करणार
मुंबई: मुंबईमधील खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे, 2000 मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता त्यापैकी सुमारे 1900 मेगावॉटचा पुरवठा आता सुरु झाला आहे, उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल, अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर.के.सिंग यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही ते म्हणाले.