Join us

Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 17:02 IST

नंदा कदम असं मृत महिलेचे नाव

ठळक मुद्दे वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत ३० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई - सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंदा कदम असं मृत महिलेचे नाव असून वाशी येथील पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  नंदा कदम यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील मृतांची संख्या ७ वर पोचली आहे.१४ मार्चला संध्याकाळी ऐन गर्दीच्या म्हणजेच ७.३० वाजताच्या दरम्यान सीएसएमटीजवळील हिमालय हा पादचारी बहुतांश पुलाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ३० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनासीएसएमटी पादचारी पूलमृत्यू