मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 23:50 IST2025-10-05T23:49:06+5:302025-10-05T23:50:30+5:30
Mumbai Crime News:

मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
एका राजकीय नेत्याच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे परिसरात घडली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपी मुलगा हा शिवसेना ठाकरे गटाच्या वांद्रे परिसरातील एका स्थानिक नेत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी मुलगा हा २० वर्षांचा असून त्याने पीडित मुलीला शौचालयात गाठून तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी मुलावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपी मुलाला कोर्टात हजर केले असता त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, ही घटना परिसरातील पुरुष शौचालयात घडली असून, या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करताना तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.