Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:31 IST2025-11-21T13:29:05+5:302025-11-21T13:31:31+5:30
Mumbai Crime Video: मुंबई उपनगरात एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्या व्यावसायिकावर कशा पद्धतीने गोळीबार करण्यात आला, हे दिसत आहे.

Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
Mumbai Crime Marathi: दोन दिवसापूर्वी मुंबई उपनगरामध्ये एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोर बिल्डर दुकानातून बाहेर पडेपर्यंत वाट बघत होते. व्यावसायिक बाहेर पडताच ते समोरून आले आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यात गोळीबाराची संपूर्ण घटना दिसत आहे.
फ्रेडी दिलीमा भाई असे गोळीबार करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तीन राऊंड फायर करण्यात आले होते. यात फ्रेडी यांना दोन गोळ्या लागल्या. गोळ्या पोटात लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिल्डरवर गोळीबार, व्हिडीओमध्ये काय?
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये बिल्डरची हत्या करण्याचा झालेला प्रयत्न कैद झाला आहे. बांधकाम व्यावसायिक हा त्याच्या एका सहकाऱ्यासह ऑफिसमधून बाहेर पडला होता. दोघेही बाहेर येतात आणि कारच्या जवळ जातात.
व्यावसायिक कारजवळ पोहोचण्यापूर्वीच एकजण तिथे दबा धरून बसलेला होता. व्यावसायिक दिसताच तो समोरून चालत आला आणि गोळ्या झाडल्या. ज्याने गोळ्या झाडल्या त्याच्या डोक्यात हेल्मेट घातलेले होते.
आरोपीने दोन-तीन राऊंड फायर केले. गोळ्या लागल्यानंतर जखमी झालेला व्यावसायिक जमिनीवर कोसळला. त्याच्या सहकाऱ्याने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो पळून गेला. त्यानंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या फ्रेडी दिलीमा भाई यांना त्याने उचलले.
चारकोप गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर#Mumbai#mumbaiCrimepic.twitter.com/ZGCWRKXQ2T
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 21, 2025
कांदिवली चारकोप परिसरातील बंदर पाखाडी येथील पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. व्यावसायिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.