गँगस्टर डीके रावला अटक क्राईम ब्रांचकडून अटक; खंडणी मागितल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:39 IST2025-01-23T17:38:11+5:302025-01-23T17:39:11+5:30

कुख्यात गुंड डीके रावला मुंबई गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात अटक केली आहे.

Mumbai Crime arrested Gangster DK Rao in connection extortion case | गँगस्टर डीके रावला अटक क्राईम ब्रांचकडून अटक; खंडणी मागितल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

गँगस्टर डीके रावला अटक क्राईम ब्रांचकडून अटक; खंडणी मागितल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

Mumbai: गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला मुंबई गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात अटक केली आहे. हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने ही कारवाई केली आहे. हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हे शाखेने डीके रावसह सात आरोपींना अटक केली आहे असून पुढील तपास सुरू केला आहे. डीके राववरील या कारवाईमुळे मुंबईत पुन्हा खंडणीच्या रॅकेट सुरु असल्याचे उघड झालं असून पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.

गुंड डीके राव याने एका हॉटेल व्यवसायाला अडीच कोटींच खंडणी मागितली होती. डीके राव आणि इतर सहा जणांनी खंडणी न दिल्यास हॉटेल ताब्यात घेण्याचाही कट रचला होता. मुंबईतील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला या हॉटेल व्यावसायिकाकडून तक्रार मिळताच डीके राव आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्यात आली. भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवून डीके रावसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

डीके राव हा मुंबईतील एक कुख्यात गुंड असून ज्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. खंडणी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होता. राव हा छोटा राजनचा एक महत्त्वाचा सहकारी देखील मानला जाते. मुंबईतील व्यावसायिक आणि विकासकांना लक्ष्य करून खंडणी रॅकेट चालवण्यात रावची भूमिका असल्याने तो प्रसिद्ध झाला होता. गेल्या काही वर्षांत त्याला विविध गुन्ह्यांसाठी अनेक वेळा अटक करण्यात आली आहे.

सात वर्षापूर्वी देखील डीके राव याला ५० लाखांची खंडणी  मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. धारावी झोपडपट्टीत एसआरएअंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाचे काम घेतलेल्या बिल्डरला डीके रावने धमकावले होते. रावविरोधात यापूर्वी मुंबईत २० गुन्हे दाखल आहेत.

कोण आहे डीके राव?
  
रवी मल्लेश वोरा उर्फ डी के राव हा यापूर्वी २० वर्षे तुरुंगात होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी तो बाहेर आला होता. काही वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक मृदुला महेश लाड यांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या खिशात एका बॅंकेचे बनावट ओळखपत्र मिळाले होते. त्यावर त्याचे नाव डी के राव असे होते. तेव्हापासून त्याला अंडरवर्ल्डमध्ये डीके राव नावाने ओळखले जाऊ लागले. यावेळी त्याला सात गोळ्या लागल्या होत्या. तरीही तो जिवंत होता. मुंबईतील सुपरकॉप डी शिवानंदन यांनीही एका एन्काउंटरमध्येही रावचा खात्मा करण्‍याचा प्रयत्न केला होता. परंतु राव त्यात थोडक्यात बचावला होता. 

Web Title: Mumbai Crime arrested Gangster DK Rao in connection extortion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.