लोकांची नेहमी वर्दळ असणाऱ्या मरीन ड्राईव्हवरील नरिमन पॉइंटजवळ एका तरुणीचा मृतदेह समुद्रात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमाही आढळून आल्या आहेत.
नरिमन पॉईंटजवळ सोमवारी एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह समुद्रात आढळून आला. माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तरुणीने काळा टी शर्ट घातलेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव मनिता गुप्ता असं आहे. तिच्या चेहऱ्यावर जखम असल्याचे आढळून आले आहे. २४ वर्षीय मनिता गुप्ता रविवारपासून (२४ ऑगस्ट) बेपत्ता होती. कफ परेड पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करण्यात आली होती. तिचा शोध घेणे सुरू असतानाच मृतदेह सापडला.
मनिता गुप्ताने आत्महत्या केली की, तिच्यासोबत काही घातपात झाला, असे प्रश्न तिचा मृतदेह मिळाल्यानंतर उपस्थित होत आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मनिताच्या मृत्यूबद्दल काही गोष्टी समोर येतील असे पोलीस सूत्रांनी सांगितले.