Join us

कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचा कँडल मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 17:06 IST

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील  8 वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेस रविवारी कँडल मार्च काढणार आहे. 

मुंबई - जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील 8 वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेस रविवारी (15 एप्रिल) कँडल मार्च काढणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात 15 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता मुंबई काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. मुंबईतील जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत काँग्रेसचे सर्वस्वी आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 

टॅग्स :कठुआ बलात्कार प्रकरणसंजय निरुपमकाँग्रेस