लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ५४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचा आढावा घेण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत. संरक्षक भिंत, डेस्क-बेंच, स्वच्छतागृहे, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय सर्व परीक्षा केंद्रांवर असल्याची खातरजमा मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे. परीक्षा केंद्र परिसर व संबंधित वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत.
पालिकेच्या माध्यमिक विभागाकडे पुरेसा निधी नाही
मात्र, सीसीटीव्ही बसविण्यासाठी पालिकेच्या माध्यमिक विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे निधी शासनाकडून मिळावा, यासाठी शिक्षणाधिकारी खरे यांनी उपसंचालक कंकाळ यांना ३० जानेवारीला पत्र पाठविले आहे.
१,०१० कॅमेऱ्यांची आवश्यकता
मुंबईतील ५४ परीक्षा केंद्रांमध्ये ४७८ वर्गखोल्या वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्गखोलीत किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्याध्यापकांच्या खोलीत किमान एक कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. एकूण १,०१० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
Web Summary : Mumbai schools require ₹5 million for CCTV installation before the tenth-grade exams. The education officer requested funds from the Deputy Director of Education, highlighting the need for 1,010 cameras across 54 examination centers to ensure security and prevent cheating during exams.
Web Summary : मुंबई के स्कूलों को दसवीं की परीक्षा से पहले सीसीटीवी लगाने के लिए ₹5 मिलियन की आवश्यकता है। शिक्षा अधिकारी ने शिक्षा उप निदेशक से धन का अनुरोध किया, जिसमें 54 परीक्षा केंद्रों पर सुरक्षा सुनिश्चित करने और परीक्षा के दौरान धोखाधड़ी को रोकने के लिए 1,010 कैमरों की आवश्यकता पर प्रकाश डाला गया।