Mumbai: मुंबईतील बोरिवलीमध्ये कार पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू; एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:49 IST2025-05-31T17:47:49+5:302025-05-31T17:49:44+5:30
Car Parking Lift Collapses In Borivali: मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका बहुमजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट कोसळली.

Mumbai: मुंबईतील बोरिवलीमध्ये कार पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू; एक जण जखमी
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका बहुमजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (३१ मे २०२५) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
#WATCH | Mumbai, Maharashtra: One person died after a car parking lift collapsed in Borivali West. Another person was injured and has been admitted to a hospital and is in a stable condition.
— ANI (@ANI) May 31, 2025
(Visuals from the spot) pic.twitter.com/gsLCCM4pUf
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील २१ मजली ओम प्रथमेश टॉवरमध्ये सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकानुसार, कोसळलेल्या लाईफ प्लॅटफॉर्मखाली दोन जण अडकले आणि त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. जखमींना ताबडतोब बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी शुभम मदनलाल धुरी याला मृत घोषित केले. तर, सुनजीत यादव याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिस आणि अग्निशमन अधिकारी कोसळण्याचे कारण शोधत आहेत.