निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:13 IST2025-07-23T13:12:23+5:302025-07-23T13:13:56+5:30
मुंबई : लोकल ट्रेन बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणून ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर डॉ. वाहीद शेख यांची २०१५ मध्ये निर्दोष ...

निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात
मुंबई : लोकल ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर डॉ. वाहीद शेख यांची २०१५ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सुटकेनंतर ते आपल्या शिक्षकी पेशात परतले. सध्या ते अंजुमन इस्लाम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि ‘प्रिझन लिटरेचर’ या विषयात डॉक्टरेटही संपादन केली. फावल्या वेळात ते गरजूंना मोफत कायदेविषयक सल्लाही देतात.
या खटल्यातील इतर १२ आरोपी निर्दोष आहेत. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा मी सातत्याने करीत होतो. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आणि सत्य समोर आले, अशी प्रतिक्रिया डॉ. शेख यांनी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला आहे. मात्र, या आरोपींच्या आयुष्यातील १९ वर्षे तुरुंगात गेली. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा त्रास भोगावा लागला त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला.
बेगुनाह कैदी
सुटकेनंतर डॉ. शेख यांनी ‘बेगुनाह कैदी’ हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या पुस्तकात त्यांनी, त्यांना आणि इतरांना कशा प्रकारे खटल्यात आरोपी म्हणून गोवले गेले आणि अमानुषपणे वागवले गेले, याबाबत लिहिले आहे.
शाळेत पुन्हा नियुक्ती
डॉ. शेख हे अंजुमन इस्लामच्या शाळेत शिक्षक होते. मुक्ततेनंतर, राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास परवानगी दिली आणि नऊ वर्षे विनावेतन राहिल्याने त्याचा फरकही दिला. याबाबत अंजुमन इस्लामचे सीईओ शगफ नाकीद म्हणाले, “निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शेख यांची अंजुमन इस्लामच्या शाळेमध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.